आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार 'पीएम सन्मान निधी' योजनेचा लाभ; पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोदी सरकारचा मोठा निर्णय

Foto

नवी दिल्ली: पंतप्रधान पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतलेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आली असून आता सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.  या योजनेंतर्गत अपभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु अर्थसहाय्य दिले जाते. आता प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. 

  काल(गुरुवारी) पंतप्रधान मोदींसह त्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळाने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यानंतर आज सकाळी मंमंत्र्यांचे खातेवाटपही करण्यात आले यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी प्रचारादरम्यान पीएम सन्मान किसान निधी योजनेची व्याप्ती वाढवण्यासंबंधी घोषणा केली होती. त्याचप्रमाणे भाजपने आपल्या जाहीरनाम्यातदेखील या आश्वासनाचा समावेश केला होता. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हे आश्वासन पूर्ण करून मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिल्याचे बोललं जात आहे.